Follow @vijayjdarda
नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात

नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात

СНПЧ А7 Ульяновск, обзоры принтеров и МФУ

विज्ञानाशी संबंधित विषयावर मी नेहमीच उत्साहित असतो. कारण विकासाचा वेग विज्ञानातूच अधिक प्रवाहित होतो. सोमवारी नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात मला आयुष्यातील काही अमूल्य क्षण वेचण्याची संधी मिळाली. अनाथाश्रमातील ८५० मुलांना विज्ञानजगताशी परिचित करण्यासाठी रोटरी क्लब आॅफ ईशान्य नागपूरने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. क्लबचे अध्यक्ष पीयूष फत्तेपुरिया, सचिव प्रीतेश चांडक आणि प्रकल्प समितीचे अध्यक्ष जगदीश भैया यांच्या अद्भूत आयोजन क्षमतेचे मी कौतुक करतो. रोटरियन मुला-मुलींनी ज्या प्रेमाने अनाथाश्रमातील मुलांना जेवण वाढले, हे बघून मी तर भावूकच झालो. विशेष बाब अशी की, जे अन्न त्या मुलांनी खाल्ले तेच अन्न आम्हीही खाल्ले. या अभिनव आयोजनात मला निमंत्रित आणि सहभागी करून घेतल्याबद्दल मी सर्व पदाधिकाºयांचे आभार मानतो.

आपल्या वैज्ञानिकांनी नवनवे शोध लावले नसते तर आपले आयुष्य खचितच एवढे सुखकारक झाले नसते. सोमवारी नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात रोटरी क्लब आॅफ ईशान्य नागपूरने आयोजित केलेल्या या अभिनव आयोजनात मला जगातील ख्यातनाम दिवंगत वैज्ञानिकांचे पुण्यस्मरण करण्याची संधी मिळाली. ज्या सर्व वैज्ञानिकांनी हे विश्व आणि आपले सर्वांचे आयुष्य सर्वोत्तम बनविण्याचे काम केले त्या सर्व वैज्ञानिकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. हे वैज्ञानिक नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत आहेत.

Vijay Darda on Facebook

Vijay Darda on Facebook